STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

अश्रूंची धारा

अश्रूंची धारा

1 min
330

तू जेव्हा हृदयी आठवणीत बरसतो,

अश्रूंची धारा नकळत वाहतो..।।


तुझ्या स्पर्शगंधात क्षण मी टिपत,

घट्ट हाताची विण तू संभाळत.

डोळ्यात पापणीच्या मोतीत ओझरतो,

अश्रूंची धारा नकळत वाहतो..।।१।।


तुझ्या सोबत निशिगंध मोहरवीत,

विरह निखाऱ्यात एकटीच तळमळत.

नुकतेच सुखाच्या सरीत भिजत होतो,

अश्रूंची धारा नकळत वाहतो..।।२।।


जीव मारत उद्याच्या रंगात दंगणार,

वाटलेच नाही उद्या तू न दिसणार.

परतून येशील वाट तुझी पाहतो,

अश्रूंची धारा नकळत वाहतो..।।३।।


जन्म,मृत्यू प्राक्तनांचा खेळ सांगतो,

निष्पाप, प्रामाणिक माणसा होरपळतो.

काहीचे शंभर गुणे मोजत बसतो,

अश्रूंची धारा नकळत वाहतो..।।४।।


Rate this content
Log in