STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

अर्थ जगण्याचा …..

अर्थ जगण्याचा …..

1 min
654

हसत खेळत हसत खेळत जीवन गाणे गात जगावे,

कधी चालत कधी थांबत पुढे पुढे जात राहावे,

         जे जे उत्तम उदात्त उन्नत ते ते सारे घेत जावे,

         जे जे वाईट नको नको ते सारे काही सोडून दयावे,

मिळवीत जावे कणाकणाने विद्या अन् धन शर्थीने,

जोडीत जावे तनामनाने एक एक नाते प्रेमाने,

         आपण अपुले मिळवीत जावे दुज्या देखील हात दयावे,

         स्वार्थ आपुला साधत असता परमार्थही करीत राहावे,

असे जगावे फुलासारखे गंधित करुनी दुसऱ्याला,

मरणानंतरही उरून राहील अर्थ आपुल्या जगण्याला. 


Rate this content
Log in