अर्जुन
अर्जुन
1 min
157
प्राॅ.१६
१६/०५/२०१९
शीर्षक - अर्जुन
घडले होते 'महाभारत'
कृपा कौरव-पांडवांची,
घायाळ रथी-महारथी
पेटली होळी रक्ताची...
असे एक अर्जुन यात
पंडू-कुंती तृतीय पुत्र,
कृष्ण ज्याचा सारथी
क्षत्रिय होते त्याचे गोत्र...
धर्नुधारी तो अद्वितीय
युद्धकौशल्यात प्रविण,
एक वीर अपराजित
नर तो, कृष्ण नारायण...
गुरु द्रोण, शिष्य पार्थ
पार्था लाभला आशी,
लक्ष्य वेधूनिया त्याने
केली मैत्री धनुष्याशी...
एकाग्रता होती ठायी
जगा दाविला बाणा,
'अर्जुन' नावाचा वीर
फुस्कारलेला फणा...
