अपेक्षा
अपेक्षा
का अपेक्षा करता तुम्ही?
मी मिसळावे समाजात
जेव्हा बोलतो जनमाणसात
तेव्हा का करता गप्प तुम्ही?
हे शरीर आहे माझ
त्यातला आत्माही माझाच
मग का लादता तुम्ही
माझ्यावर ओझ अपेक्षाचं
त्यान तस केल
म्हणून मी करणार नाही
आणि मी असंच का केलं ?
म्हणूनी कोणी मला विचारणार नाही
हे आयुष्य माझं आहे
जगाव कस नि मराव कस?
हे होत माहीत मला तुम्ही सांगण्याअगोदरच
मग का सारख लेखता मला कमी
जणू मी नाही स्वप्न करु शकत पूर्णच
हवय याच उत्तर मला आज
कारण या समाजाला चढलाय माज
गर्दीत जगत असताना
कधी नाही दीला सम्मान
आणि आज जेव्हा गर्दीपासून झालोय वेगळा तर
सतत सहन करावा लागतो अपमान....