STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

अनुबंध प्रेमाचा

अनुबंध प्रेमाचा

1 min
350

जीवनाच्या रंगमंची

दुःख प्रत्येकास असते

हास्य हे क्षणभंगुर

दुःख कायम साचते

सोडून तू मला गेली

मनास आज पटते

माझ्या श्वासात तुझे

पैंजण रोज वाजते

नको पाश मजला हे

मोह माया मी सोडली

नको वेठीस धरू तू

आग मनात दाटली

भाग्य इथे प्रत्येकाचे

हृदयात हे साठते

माणसाची ही नजर

मना मनात वाचते

अनुबंध प्रेमाचा मी

मनात माझ्या बांधला

दुःख माझे मी आता

कंठात मी हा दाबला


Rate this content
Log in