अनुभव
अनुभव
1 min
44
अनुभवांची असे माळ
तीच शिकवे शहाणपण
गुंफली जाते काळ जाता
देते आपणास शिकवण
आधीच्या पिढीचे अनुभव
ऐकता मार्ग होतो सुलभ
कळती उणीवा आधीच
रहात नाही शंकेचे मळभ
हवी अनुभवाची शिदोरी
चुक होण्याचा नसे बहाणा
म्हणूनच तर म्हणती जन
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
लिहून ठेवले पूर्वजांनी
आलेले अनुभव तयांचे
साधे सरळ सोपे झाले
पथ जीवनात भवाचे
वरिष्ठ मंडळींची हजेरी
उगा का हवी वाटे घरात
बोल येती सदैव कामी
रोजच्या व्यवहारात
