STORYMIRROR

vaishali vartak

Others

3  

vaishali vartak

Others

अनुभव

अनुभव

1 min
197

अनुभवांची असे माळ

तीच शिकवे शहाणपण

गुंफली जाते काळ जाता

देते आपणास शिकवण


आधीच्या पिढीचे अनुभव

ऐकता मार्ग होतो सुलभ

कळती उणीवा आधीच

रहात नाही शंकेचे मळभ


 हवी अनुभवाची शिदोरी 

 चुक होण्याचा नसे बहाणा

म्हणूनच तर म्हणती जन

पुढच्यास ठेच मागचा शहाणा


लिहून ठेवले पूर्वजांनी

आलेले अनुभव तयांचे

साधे सरळ सोपे झाले

पथ जीवनात भवाचे


वरिष्ठ मंडळींची हजेरी

उगा का हवी वाटे घरात

बोल येती सदैव कामी 

रोजच्या व्यवहारात


Rate this content
Log in