STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

अंगणात नाचे मोर

अंगणात नाचे मोर

1 min
237

हृदयाच्या माझ्या दर्यात 

आहेस लपलेला काही खास 

जणू मनाच्या अंगणात नाचे मोर 

प्रेम गीतांचा पिसारा फुलवून 


आठवणींच्या कप्प्यात लपलाय 

रंगीन पिटारा रम्य संगतीचा 

मोराच्या मोहक रूपाचा डोलारा 

खास दिसतोय भावनांच्या मोहात 


भान हरपले बेधुंदीच्या नशेत 

अंगणात नाचले बेभान होऊन 

दृश्यात माझ्या मोराचा तोरा 

डोलतोय आनंदाच्या धक्क्यात 


Rate this content
Log in