अंधाराचा साज
अंधाराचा साज
1 min
857
चंद्र रोज सजतो आहे...
प्रकाशफुले घेऊन ओंजळीत रात्र संभाळतो आहे...
युगायुगांची अंधार यात्रा करतो आहे...
चंद्र रोज उगवतो आहे...
किती तऱ्हा..
किती चंद्रकोरा...
सूर्याचा टेंभा मिरवतो आहे...
आमावसेचा अंधार लपेटतो आहे...
चंद्र रोज सजतो आहे...
अंधाराला चढवून साज नवा...
वाट पुनवेची पहातो आहे...
विस्कटून क्षितिजाची काळोखरेखा...
चंद्र रोज हसतो आहे...
आकाशाच्या भाळी माळुन चांदणशलाका...
रोज नवा डाव मांडतो आहे...
नीत नव्या स्वप्नांचे पेरून मोती...
प्रेमीकांसही छळतो आहे...
चंद्र नेहमीसारखाच सजतो आहे...
