STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

अनाथाची दिवाळी"

अनाथाची दिवाळी"

1 min
324

अनाथ नाही हो आम्ही

आहोत आम्ही स्वाभिमानी

आगमन जेव्हा होई दिवाळीचे

मनाला आनंद होई भरभरूनी।।

आईबापाविणा आहोत अनाथ

ती एकच दु:ख मनी दाटते

निदान आई तरी दिली असती

दोन घास तिने भरविले असते।।

दिवाळीचा फराळ कसा असतो

माहितच नाही आम्हा ती प्रभावळ

कुणी दये पोटी आणून देतात

खराब झालेला शिळा फराळ।।

गोडव्याची ना वाणगी आयुष्यात

नसे दिपोत्सवाचा लखलखाट

तीळ-तीळ जळतो दिव्यासारखे    

ना उगविली कधी चैतन्याची पहाट।।

नशिबात असे घोर अवहेलना

क्षणो क्षणी काहूर उठे मनी

आमच्या आयुष्यात भूत भविष्य नसे

जगतोय आम्ही अवसाद घेवूनी।।


दया माया लाचारी जतनी आहे

भल्या लोकांची ही कमी नाही

कोणी रडवतात कोणी हसवतात

जीवनगाण्यात काही स्वर नाही।।

तुम्ही करा दिपावळी साजरी

खुप लावा उटणे घाला दागदागिनं

पण अनाथाप्रती ही भाव जागवा

असू द्यावी तुमची नजर मेहरबान।। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन