अनाकलनीय गूढ?
अनाकलनीय गूढ?
1 min
268
तिथी किंवा तारीख
घोळ पाचवीस पुजलेला |
चूक की बरोबर
संशय मनी रुजलेला | |१ | |
विरोध वा समर्थन
डाव राजकारणी मुरलेला |
होय किंवा नाही
संघर्ष जीवनी उरलेला | |२| |
आपला अथवा परका
सल काळजात रूतलेला |
इष्ट व अनिष्ट
गोंधळ सदा ठरलेला | |३| |
योग्य होते अयोग्य
अहंकार असता जपलेला |
गोडही लागते कडू
दोष असता लपलेला | |४| |
चांगले दिसते वाईट
तिरस्कार असता भरलेला |
सुखापाठी येते दु:ख
शाप करंटा ठरलेला | |५| |