अजून सारे तसेच आहे
अजून सारे तसेच आहे
1 min
220
अजून सारे तसेच आहे
तुरुंग सारे इथेच आहे
जलात सृष्टी अखंड न्हाली
झरे तरी आटलेच आहे
पहाट झाली सुटेल वारे
नभात तारे जुनेच आहे
घरात नाही अजून शांती
कटात काटे बरेच आहे
विशाल वाटे दुरून सारे
असत्य सारे खरेच आहे
कुणा म्हणावे जरा शहाणा
बघाल सारे खुळेच आहे
समुद्र सारा घरात आला
घरात भांडे रितेच आहे
