अडथळा
अडथळा
1 min
345
भिजणे आणि रुजणे
तुला चांगलेच जमते
पण हल्ली तू तशी भिजत नाही
आणि मनासारखी रुजतही नाही..!!
नकळे तुझ्या मनाच्या मातीला
कोणत्या काँक्रीटचा अडथळा आहे
पण तो कोसळतोय अविरत
अन् पाण्याचा निचराही होत नाही..!!
कदाचित हेच कारण असेल
त्याच्या रागाचं अन् कोसळण्याचं
हल्ली पूर्वीसारखा सुसंवाद घडत नाही
अन् आकाश धरेचं मिलन होत नाही..!!
