अभंग
अभंग
1 min
207
माहे तो आषाढी ! उल्लाशी पंढरी
आला वारकरी ! गजरात !!१!!
नाद मृदुंगाचा ! नाचे तालावरी
नाम मुखावरी ! पांडुरंग !!२!!
विठ्ठल विठ्ठल ! गजर नामाचा
टाळ भजनाचा ! घुमे नाद !!३!!
कृष्णसखी डोई ! मुखावर सुख
भेटाया उन्मुख ! विठ्ठलासी !!४!!