STORYMIRROR

Rohini Gandhewar

Others

3  

Rohini Gandhewar

Others

आयुष्याची संध्याकाळ

आयुष्याची संध्याकाळ

1 min
383

आयुष्याच्या संध्याकाळी, रात्र होणे बाकी आहे

आकाशाच्या क्षितिजी अजून, केशरी तेजोगोल आहे!


सुरकुतलेल्या या चेहऱ्यावरचे, भाव हिरवे आहे

थरथरणाऱ्या हाताचे त्या, लेखन बाकी आहे!


किलकिलणाऱ्या डोळ्यांचे ह्या, तेज सक्षम आहे

भ्रमंतीच्या सुखद अनुभवाचे, चित्र स्पष्ट आहे!


कानांच्या निर्बुद्ध पडद्याचे, आघात ऐकत आहे

पुटपुटणाऱ्या ओठावरचे, शब्द समजत आहे!


अडखळणारे पाय अजुनी, अंतर कापत आहे

दूरदूरचे रस्ते मात्र, परिचयाचे वाटत आहे!


देहातील मनाची चाहूल, अजून चंचल आहे

कितीही फिरून आले जरी, थकणे बाकी आहे!


आयुष्याच्या रात्रीचे क्षण आता, मज स्पर्शिले आहे

काळालाही वेळेचे गणित सुटणे, अजून बाकी आहे!


Rate this content
Log in