आयुष्य
आयुष्य
आयुष्यात कधी वाटलंही नव्हतं असा ही एक आजार येईल
ज्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन जाईल
वाटलही नव्हतं कधी की असं ही लॉकडाऊन येईल
ज्या मध्ये माणूस माणसापासून दूर जाईल
वाटलही नव्हतं कधी की हे माणसा - माणसातल अंतर इतकं वाढत जाईल
की ज्याने माणसातील माणुसकी पूर्णपणे संपून जाईल
वाटलंही नव्हतं कधी की माणूस आपल्याच घरात असा बंदिस्त होईल
आणि सर्व पक्षी प्राणि मात्र खुल्या निसर्गात मुक्त विहार करतील
वाटलंही नव्हतं कधी की आयुष्यात आपल्या जवळचे परके होतील
भेटीच्या ओढीचे अंतर आपोआपच मिटले जाईल
असे कसे हे जीवन जगणे आले
जिथे एकमेकांवरील रुसवे-फुगवे ही थांबले
असे कसे हे मन बेचैन झाले
आता सर्व काही थांबेल की काय हेच मनात रुजले
