आयुष्य जगुन तर बघ!
आयुष्य जगुन तर बघ!
1 min
201
खचशिल पडशिल थकशिल तु
पण नव्याने वाट काढून तर बघ....
दुःख येतील खुप आयुष्यात
पण त्याना हरवून तर बघ......
जिंकशील आयुष्यात नेहमी तु
पण जिकण्याचं प्रयत्न करुन तर बघ....
नेहमी रुसतो तु माझ्यावर
पण कधी हसवुन तर बघ.....
तुझ्या सुुखात नसणार कदाचित मी
पण दुःखात आठवून तर बघ....
मी आहे खुप वेडी
पण मला समजून तर बघ....
मी नाही होणार मीरा तुझी
पण राधा बनवून तर बघ......
आयुष्य खुप सुंदर आहे
ते थोडं जगुन तर बघ.....
