आवडत नाही जे मला
आवडत नाही जे मला
आवडत नाही जे मला
त्याकडे लक्ष का देवू मी
माझा वाटेल हा तुम्हा अहंकार
परंतु हा तर आहे माझ्या
स्वभावाचा अलंकार
नसते लोक देता मला
सल्ले विनाकारण
का ऐकू मी तयाचे
नी चाटू का त्यांचे चरण
आहे मी रागीट थोडा
मान्य आहे मला
पण हे लोकं मला वेगळा
समजतात का ?
हे लागेल वेळ समजायला
अरे असे आले किती
नि गेले किती
परंतु आपली साथ
फक्त त्या व्यक्तीला
जो समजतो आपल्याला
आता काय पण म्हणा तुम्ही
हा असाच आहे मी
नेहमी सत्य ही बोलतो
परंतु आपल्याला राग आला
तर त्याचा बदलाही घेतो
वाईट नव्हतो मी कधीच
या जगाने बनवले मला असा
कि स्पर्धेची आवड नसता
बनवले स्पर्धक त्यास साजेसा
मी अजीबात करणार नाही
जे सांगाल तुम्ही मला
कारण राजा मी मर्जीचा
माझ्या ते आवडत नाही मला
