STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

आवड मला शिक्षणाची

आवड मला शिक्षणाची

1 min
14.8K


शिक्षणात प्रयोग आला

वाचन प्रक्रिया सुधारण्याला

शाळेची आवड लागण्याला

नवा उत्साह वाढविण्याला

कृती आराखडा उदयाला

आनंददायी शिक्षण देण्याला


त्याने आत्मविश्वास वाढला

न्यूनगंड निघून हो गेला

मायबोलीचा वापर केला

बालक समजू लागला

खेळ, अभिनय प्रभावी शिकण्याला

नाच, संवाद आहे जोडीला


कलाकृतीच्या शिक्षणाला

प्राधान्य बालक क्षमतेला

उत्साह नवीन शिकण्याला

शिक्षणाची आवड बालकाला

श्रवण, वाचन, संभाषण, लेखन

हे शिक्षणातून खरे आकलन


मुलांचा सहभाग वाढला

शाळाकडे आकर्षित झाला

कृतियुक्त शिक्षण देण्याला

घालू सांगड बोलते करण्याला

चित्रांच्या गंमतीदार वास्तवतेला

शब्द संपत्ती वाढविण्याला


प्रयोग यशस्वी झाला

वाचन उद्दिष्ट गाठण्याला

प्रत्येकाचा विकास झाला

प्रगत शिक्षण महाराष्ट्राला

बालक वाचू लागला

शिक्षणात बदल झाला


कृती करण्या आतुर झाला

निर्माण झाला जिव्हाळा

भीती मनातील पळून गेली

वाचन क्षमतेने किमया केली

महाराष्ट्राची प्रगती झाली

बहुभाषिक शिकू लागली

मातृभाषा प्रगत केली

वाचन तंत्र यशस्वी झाली


Rate this content
Log in