आठवणी...
आठवणी...
1 min
265
ऊसळल्या त्या आठवणी
झाल्यात उंच लाटा
खातो मी गटांगळ्या
कसे पोहचू त्या काठा..1
नको नको म्हणता
त्या जमाच झाल्या
त्यांनीच माझ्या संवेदना
आज जाग्या केल्या..2
त्या काही कडू
काही खूपच गोड होत्या
कशाही असल्या तरी
त्या माझ्याच होत्या..3
आता ओसरल्या
हळू हळू शांत झाल्या
पण मनाच्या जखमा
त्यांनी अशांत केल्या..4
त्यांना मला कधी
रोखता येत नाही
जास्त प्रयत्न केलाच तर त्या
उसळल्या शिवाय राहत नाही.. 5
म्हणून येतील तशा
त्यांना येऊ द्यावे
त्यांच्याच आठवणीत
आपण रमून जावे.. 6
