आता तरी दुर्गा हो
आता तरी दुर्गा हो
आता तरी दुर्गा हो
जागव तुझ्यातील नारी शक्तीला
स्वता:च्या नव्या अध्यायाची
चपराक बसू दे विकृत वृत्तीला...
आता तरी दुर्गा हो
जीवन तुझंच आहे जरी
आता तरी जग स्वतःसाठी
तुझ्यातील शक्तीला
नवी दिशा देण्यासाठी...
आता तरी दुर्गा हो
सोडून लाचारी मदतीची ना आस कर
संकट ही येणारंच आहे
वादळाशी दोन हात कर...
आता तरी दुर्गा हो
जगतानाही अशी जग
उदाहरण बनावं प्रत्येकाला
तेव्हाच अर्थ उरणार
आयुष्यात तुझ्या जीवनाला....
आता तरी दुर्गा हो
नको देऊ आडोसा बाईपणाला
अन् मस्तवाल समाजाला
कुठेवरी सांडणार अनावर
रक्तबंधाचा सडा घराला....
आता तरी दुर्गा हो
कितीही झोकून दिलेस
स्वतः ला
शब्दांचे टोकदार बाण
रक्तबंबाळ करतील पंखाला...
आता तरी दुर्गा हो
पिसाळलेल्या माणसांच्या जंगलात
मनाशी खूणगाठ बांधून घे
झेलूनी जहरी नजरा पैलतीर तो तोलून घे....
आता तरी दुर्गा हो...
