आता हळूहळू
आता हळूहळू
1 min
420
आता हळूहळू ओसरेल पूर
पाणी निघून जाईल दूर दूर..
आणि चिखल दृष्टीक्षेपात येईल
त्याची समीक्षा कर जरूर..!!
आता सावरून घे माती
शोध नव्याने हरवलेली मती..
वाढव खुंटलेल्या नात्याची गती
अन् जोड नव्याने काही नाती..!!
जुनी गाडली गेली ती विसर
मनावर मनाची सावली धर..
तग धरलेलं झाड बहरेल कदाचित
पण फळाची आशा असेल धूसर..!!
कालौघात तुटणे वेगळे असते
पण तोडणे त्याहून वेगळे असते..
जपणूक आपल्याच हाती असते
तुटलेले जुडणे मुश्किल असते..!!
