आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
1 min
704
दिन हा प्रथम चातुर्मास
सुरू उपवास करूनिया
द्वादशीस सोडण्याची रीत
आषाढी एकादशी कार्तिकी
मेळा वैष्णवांचा पंढरीत
ज्ञान, ध्यान, पूजा माऊलीची
घडो खऱ्या भक्तजना वाटे
खादाडांसी दुप्पट फराळ
चोचले जिभेचे पुरविती
नको चिपळ्या, मृदुंग, टाळ
हरी चिंतनी ऐका किर्तन
दर्शन घडो हवी तळमळ
नस्ता पळापळ व्यर्थ जाय
विठ्ठलदर्शने आत्मसुख
तहानभूक पळूनी जाय
