आशीर्वाद
आशीर्वाद
1 min
363
आशीर्वाद
माता पित्याचे,
हेच असते संचित
मुलांच्या सुखाने आयुष्य जगण्याचे!!
आशीर्वाद
गुरुजींचे, शिक्षकांचे
हेच असते गमक
विद्यार्थी दशेत यशवंत होण्याचे!!
आशीर्वाद
थोरा मोठ्यांचे
हेच असते इंगित
प्रापंचिक जीवनात यशस्वी होण्याचे
आशीर्वाद
ग्राहकांचे, श्रमिकांचे
हेच असते महत्वाचे
व्यावसायिक आणि आर्थिक यशाचे
