आशेच रोपटं
आशेच रोपटं
1 min
367
आशेच एक रोपटं उगवलं
भेगाळलेल्या जमीनीत
फुल देखील उमललं
आकांक्षांच्या अंतरित
माळरानाचे मग
वेगळेच रूप दिसले
अनंतरंगी रंगूनही
पिवळ्या रंगात हासले
येता जाता वाटसरूचे
मन प्रफुल्लित जाहले
सुकलेल्या रानात
मन आनंदाने नाहले
सोन पिवळा रंग फुलाचा
शोभला काळ्यामातीत
जगण्याच्या जिद्दीला
सलामी दिली मातीत
भेगाळलेल्या मातीत
बीज असे अंकुरले
विपरित परिस्तिथीत
आशेचे रंग विखुरले...
