STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

आर्त भावना...

आर्त भावना...

1 min
23.7K

डोळी दाटल्या 

रे मनातल्या 

आर्त भावना 

कुठे विरल्या... 


आज हरल्या 

ना गवसल्या

सौंदर्य मुखी 

नाही दिसल्या... 


या चिंतेतल्या

कटाक्षेतल्या 

इतक्या कशा 

उगा झिजल्या... 


असण्यातल्या 

आंनदातल्या 

क्षणिक होता 

रे आठवल्या... 


त्या शोधातल्या 

संगतीतल्या 

पुढ्यात आल्या 

जीवनातल्या... 


होत्या लपल्या 

चेहऱ्यातल्या 

हास्यात सखी 

गं रूपातल्या... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन