आपण कोरोना रोखू या
आपण कोरोना रोखू या
1 min
372
आपल्या विश्वाला आपण वाचवू या
सार्या जगाला सुंदर करू या
संकटाला समोर हो जाऊ या
मिळुन नाही तर एकट्याने त्याला गाढु या
हिमतीने नाही तर चातुर्याने लढु या
विळख्यातुन या बाहेर पडु या
आपण जबाबदार नागरिक बनु या
नियमाचे काटेकोर पालन करू या
अंधःश्रध्देच्या आफवा रोखू या
वैज्ञानिकते वर विश्वास ठेवु या
व्हायरसचा हो प्रसार रोखू या
सघर्षांने नाहीतर शांततेने मारू या
विषाणु मुक्त जीवन जगुया
आनंदाने मग सारेजण राहू या
