STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

आमिष

आमिष

1 min
166

कोणी मला हसवून गेलं

कोणी मला रडवून गेलं

सुखी जीवनाचे आमिष देऊन

कोणी मला फसवून गेलं


कोणी मला रागावून गेलं

कोणी मला हिसकावून गेलं

आज ना उद्या मिळेल ऐश्वर्य

कोणी मला स्वप्न दाखवून गेलं


कोणी मला टाकून बोललं

कोणी मला फटकारून बोललं

मी साऱ्याचेच ऐकत राहिलो

जे कुणी मला दुरून बोललं


कोणी मला गोड नाही दिलं

कोणी मला खाऊ नाही दिलं

सर्व असूनही उपाशीच होतो

तरी कोणी मला जेवू नाही दिलं


कोणी मला जवळ नाही घेतलं

कोणी मला माया नाही केलं

मी इतका कुरूपही नव्हतो

कोणी मला प्रेम नाही केलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन