STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

आम्ही वाचक

आम्ही वाचक

1 min
11.8K

आम्ही वाचक मराठी साहित्यिकांचे.

जाण आम्हा लेखणी तलवारीची.

नशा तिची अमतृल्य असते लयभारी.

तिची सोबत डोळस ज्ञान प्राप्तीची.


आम्ही वाचक मनकवडे.

शोधतो कवीच्या अंर्तमनाचा कवडसा.

आत्मसात करित विविध शैलीचा वारसा.

स्वप्नझेप भरारी घेत होऊन बिलोरी आरसा.


कवडसा तो आत्मविकासाचा.

मराठी सक्षमीकरणाऱ्या शिलेदार कवींचा.

ज्ञानात भर पाडणाऱ्या कलागुणांचा.

शिष्यास ध्येय प्राप्तीस मार्गदर्शक गुरुचा.


आम्ही वाचक अस्तित्वाचे वाटसरु.

प्रत्येक शब्दांचा स्पर्शगंध तो शोधत.

विकासाची रंगबेरंगी फुलांची वहिवाट वाचत.

सप्तगुणांची दडलेली शैली करू प्रगत.


आम्ही वाचक रसातळात बुडत.

हौसेने देणाऱ्याचे हात हातात घेत.

स्वतःबरोबर इतरांना देत बहर.

जळीस्थळीतून घडवू मराठी साहित्यकार.


Rate this content
Log in