आमचं आयुष्य
आमचं आयुष्य
आमचं आयुष्य चूल आणि मूल यातून मुक्त होत
अंतराळापर्यंत झेपावलेलं
सावित्रीच्या लेकींनी जिद्दीने
समाजात स्थान मिळवलेलं
तरीही एक प्रश्न उरतोच हो
समानतेचा, माणूस म्हणून वागवण्याचा?
किती निर्भयांना अजून आपण रस्त्यावर पाहणार?
आक्रोशून आधंळ्या राजासमोर न्याय मागणारी द्रौपदी
आणि मृत्युनंतरही न्यायासाठी टाहो फोडणारी निर्भया..
कधी बदलणार हे चित्र?
स्रीला उपभोगाची वस्तू समजण्याचं
पेपर वाचून, बातम्या ऐकून आपण फक्त हळहळतो
धर्माच्या नावावर मात्र एक होतो
समाजाला पेटवत सुटतो
पण...
आमचं आयुष्य, समाजातील आमचं स्थान
थोड्याफार फरकाने जिथे होते तिथेच
आमचं आयुष्य...
