आली मकर संक्रांत
आली मकर संक्रांत
1 min
144
भरदारी शालू नेसून हिरवा
तिळाच्या स्नेहाने,गुळाच्या गोडीने
भोगीला घेऊन साथ
संक्रांत आली प्रेमाच्या ओढीने
नववर्षाची नवी पहाट
संक्रांतीने केली सुरवात,
तान्ही बाळे, नव वधू,
बोरन्हानने सजल्या घराघरात
हलव्याचे दागिने लेवून
जमला काळ्या वस्त्रांचा मेळा,
हळदी कुंकू,देऊन वाण
जमवू सुवासिनीचा सोहळा
नियमांची पाटी घेऊन हाती
कोरोना वरती करू आक्रमण,
हेवे दावे विसरुनी सारे
हृदयी करू प्रेमाचे संक्रमण
गुलाबी थंडीत प्रेमाच्या मिठीत
पांघरू उबदार शेला,
विसरून मनातील कडवटपणा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
