आले सुगीचे दिवस
आले सुगीचे दिवस
1 min
302
कणसात ज्वारीच्याही
दाणा भरूही लागला
थंडीच्याही कडाक्यात
जाऊ हुरडा खायला ||
पाखरांचे दिसे थवे
हाती घेऊनी गोफण
दिसे जगाचा पोशिंदा
करी शेताची राखण ||
गर्द हिरव्या डोंगरी
गुरेढोरे चारा खाती
सांजरात होते तशी
स्वारी घरी परतती ||
दिनरात कष्ट करी
घाम गाळतो शेतात
पिके येतात जोमात
हर्ष होतोय मनात ||
आले सुगीचे दिवस
करी कापनी शेतात
मळणीसाठीही रास
येती कणसे खळ्यात ||
दाणे पोत्यात भरत
पोती गाडीत टाकत
असे कामाची धांदल
सुगी अशी बहरत ||