STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

आला श्रावण

आला श्रावण

1 min
421

आला श्रावण महिना

साज नवा चढविला

गावू गाणे आनंदाचे

फुले वाहूया शिवाला।।


आला श्रावण खुशित

मेघ मल्हार सावळा

दिसे पाऊस निळा

न्हावू घाले धरणीला।।


आला श्रावण सरींचा

मन ओले-ओले होई

मन वाहे आकाशात

त्यात रमुनिया जाई।।


वाटिकेत फुलांचा या

आला बार श्रावणात

गंध मातीचा भरला

तनमन सुवासात।।


अंगणात भावनांच्या

जळमटे श्रावणात

चांदण्याचा झुलतोय

झुला हा संकल्पनेत।।


पाऊसाची रिमझिम

झाला हिरवा निसर्ग

नाचू लागलेत मोर

श्रावणात हा संसर्ग।।


शोभे अलंकार अंगी

सजे स्त्रीया या तेजस्वी

हाती घेवूनीया परडी

गौर दिसे ही ओजस्वी।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन