आजोळी जावूया....
आजोळी जावूया....
झाली का तयारी?
लवकर चल गं आई
मामाच्या गावाला जावू
आम्हांला झाली घाई...!!धृ!!
लाल बस आली
गाडी ही निघाली
ड्रायव्हरदादा आले अन
बेल ही झाली.....(1)
पेट्या आम्ही घेतो
भरभर गाडीत नेतो
घेतलेस का खावू
गाडीत बसून जाऊ...2
गाडीत बसून जाऊ
पळती झाडे पाहू
मामच्या गावा जाऊ
मोठाला वाडा पाहू...3
आनंद फार झाला
दादा आहे सोबतीला
वड पारंबीचा झुला
आहे गं खेळायला....4
मित्र माझे भारी
आहेत गं शेजारी...
खेळ लगोरीचा
मी खेळेन दुपारी....5
लपाछपीचा गं खेळ
ठरलीया वेळ...
चल गं गाडी लवकर
ठरवू दे मेळ....6
मामा माझा लाडाचा
आणतोया भेळ...
राहून आजोळी मी
खेळायला देईन वेळ....7
आजीची गं गोष्ट
आवडते फार
आजीची गोधडी
लय उबदार.....8
