आजीची कहाणी
आजीची कहाणी
1 min
301
आज ही आठवण आजीची कहाणी
तीच्या गोष्टीतला तो राजा आणि राणी....
ऐकली गोष्ट आजीची लहानपणी
साऱ्या आठवणी आहेत ध्यानीमनी
मोठा झालो, कानी आजीची मंजूळ वाणी.....
आजीचं होतं माझ्यावर अपार प्रेम
धनुष्यबाण होता हाती चुकला ना नेम
काळजात माझ्या आजीच्या प्रेमाच्या खाणी....
अगाव होतो जगणं शिकवलं तिने
संसार तिचे माझ्यावर आई ही म्हणे
झोप येतं नव्हती आजीने ऐकवली गाणी.....
आजी तुझा संगम आज झाला मोठा
तू दुर गेलीस झाला जगण्याचा तोटा
आजी तुझ्या आठवणींत डोळ्यात पाणी.....
