STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

आज तुला माझी आण...

आज तुला माझी आण...

1 min
194

असा पिसाटला वारा

नाही त्याचे त्याला भान

कसे बरसती मेघ

ओलेचिंब झाले रान


झोपडीत आडोशाला

बाळ गाढ झोपे छान

झोपडीही चंद्रमौळी

याची नाही त्याला जाण


अशी रात काळी काळी

सारे घोंगावते वन

कधी कडाडते वीज

थरारते तनमन


आषाढीची कार्तिकीची

धनी चुकविना वारी

कसलाच भेदभाव

नाही विठ्ठलाच्या दारी


धनी नाही संगतीला

असे बाळ माझे सान

धाव धाव पांडुरंगा

आज तुला माझी आण


साहित्याला गुण द्या
लॉग इन