आईची महती
आईची महती
1 min
218
आई म्हणजे मायेचा सागर
आई म्हणजे उबदार चादर
आई म्हणजे विद्येची देवता
आई म्हणजे मनाची उदारता
आई म्हणजे भुकेल्या पोराचं मन
आई म्हणजे साऱ्या घराचं घरपण
आई म्हणजे ताकद लढण्याची
आई म्हणजे भावना निःशब्दाची
आई म्हणजे वडिलांचे मन
आई म्हणजे तान्ह्या बाळाच बालपण
आई म्हणजे मायेच साजूक तूप
आई म्हणजे परमेश्वराचे रूप
