Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sarika k Aiwale

Others

3  

sarika k Aiwale

Others

आईचा गोंधळ

आईचा गोंधळ

1 min
291


गोंधळ मांडला ग अंबे 

गोंधळाला ये.......

जागर घालितो ग दारी 

जागराला ये.......


दाही दिशा माजले काहूर 

अधार दूर सारया ये


गोंधळ मांडला ग अंबे 

गोंधळाला ये.......

जागर घालितो ग दारी 

जागराला ये.......


लखलखती दिपमाळ आकाशी 

ज्योत ज्ञानाची लावू दे...

गोंधळ मांडला ग आई शारदे

गोंधळाला ये.......

जागर घालितो ग दारी 

जागराला ये.......

जाहला हाहाकार जगी 

हलकल्लोळ ग माजला 

घेऊन अमृत वर्षाव ये जीवनी

तु महालक्षमी 

गोंधळ मांडला ग महालक्ष्मी 

गोंधळाला ये.......

जागर घालितो ग दारी 

जागराला ये.......


रान उठले दैत्य माजला 

घाव सत्त्वावर घाली घाला 

जाळाया दानवा तु ये...

गोंधळ गोंधळ मांडला ग यल्लुरे 

गोंधळाला ये.......

जागर घालितो ग दारी 

जागराला ये.......


दिस सोन्याचे येऊ परतुनी 

दान किरणांच दे...

दान सुर्याचे दे

गोंधळ मांडला ग आदिशक्त

गोंधळाला ये.......

जागर घालितो ग दारी 

जागराला ये.......


दिवट्या दिपमाळा जाळीन गं

मायक्का..

जग ऊद्धाराया तु ये ...

गोंधळ मांडला ग आदिमाया 

गोंधळाला ये.......

जागर घालितो ग दारी 

जागराला ये.......


Rate this content
Log in