आईबाबा
आईबाबा
1 min
682
निरपेक्ष निष्पाप प्रेम करतो कोण
आईबाबा आणि कोण
मुलांनी गाठावा सर्वोच्च शिखर
करतात आईबाबा सदा हाच विचार
सुख देण्याचा मुलांना सर्वोतोपरी प्रयत्न
करतात तळहातावरील फोडाप्रमाणे जतन
आयुष्याच्या संध्याकाळी
दुःख शारीरिक कष्ट आगळी
मुलांना न देता कुठलाही त्रास
डोळे मिटावे हीच आईबाबांची आस
निरपेक्ष प्रेमाचा मोबदला
कधीही मागत नाही आपला
आयुष्यभर कमावलेली संपत्ती
मुलांना देऊन जातात अंती
