STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others Children

आई

आई

1 min
172

आई परीस जीवनाचा

देते जीवना आकार

आई मायेची चादर

करते स्वप्न साकार

आई हाताचा पाळणा

मांडीवर जोजविते

तान्हुल्या जीवासाठी

किती मरमर करते

आई वात्सल्याची मुर्ती

नऊ महिने नऊ दिवस पोसते

आई काळजीचा वणवा

हाल अपेष्टा सोसते

आई काजळ भरते

सागरासम मातृत्व असते

आई माया,ममतेची ढाल

पाठीशी खंबीर राहते.

आई निर्झर झरा प्रेमाचा

आईविणा देवही भिकारी

म्हणूच दिली देवाने

प्रत्येकाच्या घरी आई

आई हृदय सागराचे

आभाळाएवढी तिची माया

आई वाळवंटातले पाणी

आई थंडगार छाया

आई सारं जिवनाचे

आई ईशस्वरूप

आई अंगाई गाते

तिचे आगळे रूप

थोर महिमा आईचा

मिनूची हरवली साऊली

का आवडली देवा

तुला माझीच विजाई माऊली...!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Rate this content
Log in