आई
आई
1 min
242
घडतोय मजला चारधाम,
अन् नित्य घडतेय काशी.
तेहतीस कोटी देव वस्ती,
आई तुझ्या गं चरणाशी.
नवमास भार सोसुनी उदरी,
दाखविलेस मला सुंदर जग.
रात्रदिन कष्टली सर्वांसाठी,
सोसली संघर्षमय जीवन धग.
वाहे संसार रहाट कर्तृत्व थोर.
जगासाठी आहेस जरी निरक्षर,
झीजे चंदनापरी घेऊन वरदान,
कठोर सहनशक्ती अथांग सागर.
पूर्व जन्माची माझी थोर पुण्याई,
त्रिवेणीगंगा संगम अमृत धार.
सर्व गुण संपन्न, ज्ञानदायिनी,
कोरलेस मनी अफाट सुसंस्कार,
शरीर लटपट स्वैपाक ती करत
विश्रांती घेण्यास विसरते काही.
सत्व परिक्षा आईची सरत नाही.
सत्वशीलांची परिक्षा देव घेत राही.
