आई
आई
1 min
81
घडतोय चारधाम
अन् नित्य घडे काशी
तेहतीस कोटी देव
आई तुझ्या चरणाशी.
सोसे नवमास भार
दाखविले मला जग.
रात्रदिन कष्टलीस
हसत जीवन धग.
फुले दीनाचा संसार
थोर मन निरक्षर,
कर्तृत्वाचे वरदान
प्रेम अथांग सागर
पूर्व जन्माची पुण्याई
अमृत संगम धार
सर्व गुण ज्ञानदायी
घडवित सुसंस्कार
करे स्वादिष्ट स्वैपाक
नाही विश्रांती सवड
झिजे शरीर चंदनी
देत परिक्षा आवड
