आई म्हणजे नक्की काय असते?
आई म्हणजे नक्की काय असते?
आई म्हणजे नक्की काय असते?
उठावरचे हसू असते
डोळ्यातले असू असते
भावभावनांनी दाटलेला 'हुंकार' असते
आनंदाने दरवळून जाणारा 'झंकार' असते
आई म्हणजे नक्की काय असते?
महासागराची विशालता असते
मनाला सतत तेवणारी वात असते
आई म्हणजे नक्की काय असते?
मनाने मनाला ओढ देणारे आदिशक्ती असते
मनाला प्रेरणा देणारे दिव्यशक्ती असते
माणसाला जीवनरुपी 'नाव' असते
हेलकावे घालत असता सावरणारी 'नोका' असते
आई म्हणजे नक्की काय असते?
स्त्रीत्वाचा उद्धार करणारी कुलस्वामिनी असते
आई म्हणजे आनंदाची शक्ती व ईश्वराची भक्ती
यांचा मिलाप
मनात अखंड तेवत राहणारी स्मृति देणारी ज्योत
म्हणजे आई असते !!!