STORYMIRROR

Vikas Kharat

Others

3  

Vikas Kharat

Others

आई चे ऋणानुबंध

आई चे ऋणानुबंध

1 min
292

बाळ रागंले रागंले, आईच्या खुशीत

कस रुजल ते बाळ, त्या सुंदर उदरात


बाळा हवी मायेची छाया, हवी आईची माया

सर्व कुटूंब सुंदर, त्यात आजीचा गजर


बाळा घेण्या मांडीवरी, होई तीची घालमेल

चक्क बसल्यावाणी कीर्तनास, मग्न होई त्या बाळात


त्या तिमीर-रात्री, चंद्र-चांदण्याच्या सोबती

ते मग्न होत आभाळ, लिहिण्यात त्याच नाव


त्याला होई घाई खूप, त्या रंगल्या डावात

कस रुजल ते बाळ, त्या सुंदर उदरात


बाळाच होता मूल, होई मुलाच पोर

हातपाय रोवुनी घरात, उभ राहील आनंदात


गात आनंदात गीत, कौलारू छपराच्या आत

कस रुजल ते बाळ, त्या सुंदर उदरात


नाही झाला युवक, जरी नसला तरुण

मद-मत्सर यांचा, नाही आला त्यावर बहर


क्षणभर आठवूणी, त्या आठवणी

निशब्द, पडूनी सावलीत

कस रुजल ते बाळ, त्या सुंदर उदरात



Rate this content
Log in