आई-बाबांचे भांडण
आई-बाबांचे भांडण


घरटे माझे सुंदर असती, त्यात प्रेमाची माणसं असती
नजर लागते या घरट्याला आज बिखरले घरटे माझे
चूक कोणाची कळत नव्हते, दोघांचे भांडण होत होते
पाहुनी मन माझे रडत होते, काय करावे कळत नव्हते
दंगा करणारा मी एकदम शांत झालो वादाचा परिणाम माझ्या मनावर झाला
सांगू कसा मी त्यांना ऐकत नव्हते कोणी माझे
समजावू तरी कोणाला समजत दोघांपैकी कोणी नव्हते
दोघांचे भांडण होत होते कारण विचार ते स्वतःचाच करत होते
मनाचा माझा कोणी विचार करत नव्हते कारण ते आपल्यात व्यस्त होते
दोघांचे भांडण कोर्टात गेले मी मात्र होतो निःशब्द
प्रश्न मला विचारण्यात आला, राहायचे तुला कोणासोबत आई की बाबा
नियतीने खेळ माझ्यापुढे मांडला दोघांपैकी पर्याय समोर ठेवला
मला मात्र दोघंही हवे होते मला माझे घरटे पुन्हा हवे होते
शेवटी मी ठरवले ऐकावे जनाचे करावे मनाचे
मनात माझ्या होते दोघांजवळ राहायचे
असं म्हणतात लग्नाच्या गाठी आधीपासून बांधतात
मग या गाठी कशा बरे तुटतात
माझी फक्त एकच मागणी असते देवासमोर
घरटे माझे मला दोघांसह हवे आहे
देवांनी ऐकलं माझं तर माझं घरटं मला मिळेल पुन्हाही