आदर्श शाळा
आदर्श शाळा
मी कोणत्या शब्दांनी तिचा उल्लेख करू
शब्दही कमी पडतील तिच्यासाठी कशी स्तुती करू
आदर्श माझी शाळा आहे असे तिला म्हणू
अ आ इ ई उ ऊ चे शिकवलेले आठवू धडे
वड्यावाल्या मामाकडून विंटरवेलमध्ये खाल्ले वडे
बोरेवाली आज्जीची नजर चुकवून बोरं खाल्ले चोरून
पिटीच्या पिरियडमध्ये उड्या मारल्या पोट भरुन
आत्मविश्वास मनातून उफाळून येत असे
जेव्हा - जेव्हा प्रत्येक खेळात मी जिंकत असे
मनात प्रबळ इच्छाशक्ती जागृत होत असे
डावरे मॅडमची आम्हाला कविता फार आवडत असे
मी एकाग्र होऊन ऐकत असे आढाव सर जेव्हा शिकवत असे
गणित तर डोक्यावरून माझ्या जात असे
इतिहास विषय तर मला फार फार समजत असे
गाईडची कामे करण्यास मज्जाच मज्जा येत असे
अभ्यास केल्यावर मला मॅडम शाबासकी देत असे
अनिता माझ्यासाठी चिंचा खूप - खूप आणत असे
वर्गात मॅडमच्या चोरून मी चिंचा खात असे
अन माया मागे बसून नुसत्या डुकल्या देत असे
वैशाली तर माझ्यावर खूप - खूपच जळत असे
कारण खेळ असो डान्स असो पहिली मी येत असे
वर्गामध्ये दुसराच नंबर वैशालीचा येत असे
डान्समध्ये तर डाके धुमाकूळच घालत असे
भरतनाट्यम करून मात्र नंबर मीच मिळवत असे
बगाटे, छाया, भराडे, घाटे माझी स्तुती करत असे
मॅडम माझी पाठ थोपटून शाबासकी देत असे
आसमंताला गवसणी घातल्याची धुंदी मला चढत असे
