आदिशक्ती
आदिशक्ती
1 min
11.9K
स्त्री म्हणून
तू कधीही
कमी पडली नाहीस
निसर्गाने तूझ्यावर सोपविलेल्या
जबाबदाऱ्या पुरे करण्यात...
जिवंत ठेवलीस तू तुझ्या
प्रेमपूर्ण वात्सल्य भरीत
निसर्गप्रदान स्वभावाला...
सहन करीत राहिलीस तू
आमच्या पुरुषप्रधान
वासनांध संस्कृतीचा
अत्याचार निमूटपणे...
पार पाडतांना
पत्नी, आई, बहीण
आणि मुलीच्या वेगवेगळ्या
जबाबदाऱ्या,
संपू दिले नाहीस कधी
तू तुझी सहनशीलता...
म्हणूनच
तुला म्हणतात आदिशक्ती...
