आभार
आभार
1 min
133
आनंदाच्या वेलीवरती आनंदाने झुलावे,
पुष्प बनूनी त्या वेलीच्या गालावरती बसावे.
आभाराची नौका होऊन पाण्यावरती डोलावे,
पाणी होऊन नदीच्या गाभ्यातच शिरावे,
नयनाच्या त्या बाणावरती एकटक बघावे,
अश्रू बनूनी नयनातून हळूचच वहावे,
काम करूनी पराक्रमाचे ईमले मोठे बांधावे,
ईमल्याच्या त्या मजल्यावरती पुष्प बनुनी डोलावे,
काम करूनी घाम गाळावे प्रसन्न होऊन नाचावे,
आभार मानुनी कष्टकर्याचे आनंदित व्हावे
