STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

आभाळमाया

आभाळमाया

1 min
323

तुझ्या दिव्य पंखाखाली

सुखेनैव चालतो कारभार

सांग मानू किती देवा?

मी तुझे रे आभार


चालवी समस्त सृष्टी

तुझा दिव्य तो प्रकाश

ओढावया दिले आम्हा

तुझे निळे रे आकाश


बरसून काळ्या जलदांनी

तोषविली तप्त धरा

प्राणी पक्षी सृष्टीचा

बघ फुलला फुलोरा


रातीचा काळोख येथे 

जरी वाटतो भकास

चंद्र अन् चांदण्याही

काळोखी देती प्रकाश


तुझ्या त्या दिव्य रुपाची

लाभू दे अशीच छाया

बरसू दे सहस्त्र करांनी

देवा तुझी आभाळमाया


साहित्याला गुण द्या
लॉग इन