Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Satpute

Others

3  

Priya Satpute

Others

प्रियांश...२

प्रियांश...२

1 min
175


सणांपूर्ती नाती अन नात्यांपुरता सण अशी अवस्था आजकाल सगळीकडेच पहायला मिळते. सणांच्या नावावर होणारे स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी महिलावर्गाला किचनमध्ये भिडाव लागत अन सगळं करूनही त्यांच्या पदरी पडते एक दिवसाचे गोड बोलणे? काहींच्या तर तेही नाही! जुन्या पिढीने स्वतःच्या मुलांना फारच गोंजारून ठेवल्यामुळे नव्या घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेला सणवार म्हणजे जीवावर आल्यासारखे वाटणे साहजिकच आहे.

सण हा संपूर्ण घराचा उत्सव असतो नाकी फक्त स्त्रियांचा मग त्यात घरातील सर्वांचाच सहभाग असणं गरजेचं आहे! मग ते अगदी स्वयंपाकघरापासून ते पूजेला बसेपर्यंत सगळीकडेच! त्यामुळे आपल्या मुलांना लहानपणापासूनच लिंगभेदापलिकडे जाऊन घरातील सणांमध्ये आरतीला टाळ्या वाजवण्यापल्याड अधिक सक्रिय करून घ्याल तर नंतर डोकं फोडायची वेळ येणार नाही. नाती जड ही वाटणार नाहीत ना सण अवघडल्या जागेच दुखणं!


त्यामुळे मी तर म्हणेन तिळगुळ घ्या अन नेहमीच गोड बोला, तोंडावर एक पाठीमागे एक असं करून नाती काळवंडून टाकण्यापेक्षा स्पष्टपणे एकमेकांशी बोला, गैरसमजांचा कडूपणा नात्याला कीड लागून सडू देण्याआधीच नात्यांमधील संवाद वाढवा, एकमेकांवर जळत कुढत आयुष्य काढण्यापेक्षा नात्यांची बाग प्रेमाने, अनुभवाने मोहरवुन टाका!


।। सुखी भवन्तु ।।


Rate this content
Log in